नोएल स्कूलमध्ये रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न दि .16 जून, 2024 ( रविवार )
नोएल स्कूल व राॅबिन हूड आर्मी यांच्या संयुक्त विद्यमाने नोएल स्कूलच्या सहसंस्थपिका स्वर्गीय सुरेखा विजय मनवर मॅडम यांच्या स्मरणार्थ दि.16 जून, 2024 ला दिवशी नोएल स्कूलच्या प्रांगणात सकाळी 8ः30 ते 12 या कालावधीत रक्तदान शिबीर अत्यंत उत्साहात पार पडले.
नोएल स्कूल व राॅबिन हूड आर्मी हया दोन्ही संस्था सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यात अग्रेसर असतात. समाजातील अनाथ व गरजू व्यक्तींना अन्नदान करणे , आवश्यक साहित्य पुरविणे , त्याचप्रमाणे अनाथ व गरजू विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य पुरविणे आणि शनिवार व रविवार या दिवशी त्यांच्यासाठी शिकवणीची व्यवस्था करणे. अशा प्रकारचे कार्य केले जातात. त्यापैकीच एक कार्य म्हणजे
‘ रक्तदान शिबीर ‘ होय़. ” दानात सर्वश्रेष्ठ दान-रक्तदान ! ” रक्तदान केल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 88% कमी होते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, कर्करोग होण्याची शक्यता कमी असते, एका गरजू रूग्णाचे प्राण रक्तदानाने वाचविल्या जाऊ शकतात. असे ‘ रक्तदान श्रेष्ठ-दान ‘ हा उपक्रम नोएल मध्ये उत्साहाने राबविला गेल.
नोएल स्कूलचे संचालक मा. अनोश मनवर सर व मा. अनुल मनवर सरांनी सर्वप्रथम रक्तदान करून शिबीराला प्रारंभ केला , तसेच नोएल स्कूलच्या शिक्षक, व इतर कर्मचारी वर्ग आणि पालकांनी सहभाग नोंदविला. राॅबिन हूड आर्मीच्या सदस्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावल.
रक्तदान शिबीर यशस्वी रीत्या पार पडण्यासाठी नोएल स्कूलचे संचालिका मा.अर्पणा डोंगरे मॅडम व संचालक मा. अनोश मनवर सर, मा.अनुल मनवर सर तसेच हेेडगेवार रक्तपेढीचे डाॅ.समीर देशमुख सर व रमेश देशपांडे सर आणि राॅबिन हूड आर्मीच्या सर्व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले.