बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताह उद्घाटनाचा मान नोएल स्कूल ला
संयुक्त राष्ट्र संघाचे बालकांचे हक्क यावरील अधिवेशन या 20 नोव्हेंबर 2019 रोजी 30 वर्ष पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, अकोला, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, चाईल्ड लाईन व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला जिल्हा बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताहाचे उद्घाटन नोएल स्कूल येथे पार पडले. उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी, शहर विभाग, श्री सचिन कदम साहेब यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या प्राचार्या, सौ अर्पणा डोंगरे मॅडम होत्या तर प्रमुख उपस्थिती मध्ये दामिनी पथक प्रमुख छाया वाघ, शाळेच्या संस्थापिका श्रीमती सुरेखा मनवर मॅडम, श्री गोपाल मुकुंद, श्री विशाल मोरे (स्वास टीम), सौ सविता सिंगर, चाईल्ड लाईन, श्री अनोश मनवर सर, प्राचार्य, CBSE स्कूल, श्री अनुल मनवर सर, मुख्याध्यापक प्राथमिक विभाग हे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शन करतांना श्री सचिन कदम यांनी बालकांचे हक्क व सुरक्षेच्या बाबतीत मुलांनी घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले तर छाया वाघ यांनी मुलांवर होत असलेल्या लैंगिक अत्याचार व या सर्वांवर आळा घालण्यासाठी असलेले कायदे यांची माहिती देत चांगले स्पष्ट आणि वाईट स्पर्श मुलांना समजून सांगितला. तसेच श्री गोपाल मुकुंद यांनी मनोरंजक रित्या मुलांना त्यांचे हक्क आणि सुरक्षितता यावर प्रकाश टाकला व कार्यपद्धती आणि माहिती उलगडून सांगितली. अध्यक्षीय भाषणातून शाळेच्या प्राचार्या यांनी या सप्ताहाचा माण शाळेला दिल्या याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे व श्वास टीमचे आभार मानले. या कार्यक्रमाला मुलांचा प्रचंड प्रतिसाद होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रोहित हिवरकर यांनी केले तर शाळेच्या संपूर्ण शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी वृंदाचा या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग होता.