पूरग्रस्त विभागातील लोकांना मदतीसाठी नोएल स्कूलद्वारा विविधा स्पर
दि. २९ ऑगस्ट रोजी ‘राष्ट्रीय क्रिडा दिनाच्या’ निमीत्ताने पूरग्रस्त निधीसाठी शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कॅरम, बुद्धिबळ, टेबलटेनिस, टेनिकवाईट, बॅडमिंटन, खो-खो, फूटबॉल, क्रिकेट, कबड्डी आशा विविध प्रकारच्या खेळांचा समावेश होता. या स्पर्धेचा निधि पूरग्रस्त विभागातील गरजू लोकांनपर्यन्त पोचणार आहे. त्यामुळे मुलांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. आकोल्यामधून ‘Play for Charity’ च्या अनुषंगा।ने नोएल शाळेतील विद्यार्थांची संख्या २४६ मुला – मुलींनी विविध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. या विद्यार्थांनी स्पर्धेसाठी स्वइच्छेने प्रत्यकी १०० रु दिले. यामध्ये एकूण रक्कम २४,६०० रु. जमा झाले. शाळेच्या प्राचार्य, सौ अर्पणा संतोष डोंगरे तसेच सी. बी. एस. ई. शाळेचे प्राचार्य, श्री.अनोश विजय मनवर व प्रायमरी शाळेचे प्राचार्य, श्री. अनुल विजय मनवर तसेच वर्ल्ड कॅरम असो. कोषाध्यक्ष आणि इंडियन रेड क्रॉस सोसायटी अकोला चे सचिव, प्रबज्योत सिंग बछेर यांनी जिल्हाचे मा. जिल्हाधिकारी, श्री जितेंद्र पापळ्कर सर यांची सदिच्छा भेट घेऊन दि. २०-०९-२०१९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निधि सपूर्त केला.