नोएल स्पोर्ट लिग – ३ दिनांक २७ जानेवारी २०२४
खेळ प्रत्येकाच्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग असतो. खेळ सांघिक कार्य ,समन्वय व निरोगी ठेवण्यास मदत करतात. शालेय अभ्यासक्रमात आजच्या बदलत्या शिक्षण प्रणालीनुसार पुस्तक आणि खेळ दोघांना सारखेच महत्त्व प्राप्त झालेले आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासातील खेळ महत्त्वाचा भाग लक्षात घेऊन नोएल शाळेत ‘नोएल स्पोर्ट लिग-३ चे आयोजन दिनांक २७ जानेवारी २०२४ला करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य माननीय सतीशचंद्र भट सर तसेच विशेष पाहुणे मा. नयन चव्हाण सर , प्रमुख उपस्थिती भरत डिक्कर सर व बी .एस .तायडे सर इतर उपस्थिती मान्यवर शाळेच्या संचालिका मा. अर्पणा डोंगरे मॅडम, संचालक अनोश मनवर सर व अनुल मनवर सर , शाळेचे प्राचार्य रविकांत शिंदे सर व क्रीडा विभाग प्रमुख शरद पवार सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलनाने झाली तसेच मान्यवरांचे स्वागत शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले तसेच इतर शाळांमधून आलेल्या प्रशिक्षकांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. मान्यवरांनी आपल्या भाषणातून उपस्थित खेळाडूंना खेळ म्हणजे जीवन आणि यशस्वी जीवनाचा परिश्रम हा मूलमंत्र आणि उत्तम व्यक्तिमत्व घडविण्यासाठी त्यासोबतच योग्य संस्कार लाभले पाहिजे असे मौल्यवान मार्गदर्शन केले.
शाळेचे संचालक अनोश मनवर सरांनी नोएल स्पोर्ट लिग -३ विषयी माहिती दिली. ‘नोएल स्पोर्ट लिग-३ ‘ नोएलच्या प्रांगणात दरवर्षी प्रमाणे पुन्हा आयोजित केली गेली आहे तसेच कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले माननीय सतीशचंद्र भट सर यांच्या हस्ते राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये महिला बॉक्सिंग स्पर्धेत वेट ७५-८० मध्ये सुवर्णपदक प्राप्त नोएल शाळेची भक्ति चुंगडे हिला सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले . राज्य स्तरावर बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त तसेच सी.बी.एस.सी . चॅम्पियनशिपमध्ये राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवल्याबाबत माननीय सतीशचंद्र भट सरांच्या हस्ते शिवराज देशमुख ला सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
नोएल स्पोर्ट लिग -३ चे खास वैशिष्ट्य म्हणून कबड्डी या खेळाचा नव्याने समावेश करण्यात आला. शाळेचे प्राचार्य रविकांत शिंदे सरांनी कार्यक्रमाच्या उद्घाटन पर भाषण अकोला शहरातील विविध शाळांमध्ये सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. शाळेच्या संचालिका अर्पणा डोंगरे मॅडम यांनी आपल्या मनोगता मध्ये खेळाडूने चांगल्या प्रकारे व जिंकण्याचा इच्छेने खेळावे असे सांगितले. हाच आजच्या स्पोर्ट्स लिगचा महत्वपूर्ण उद्देश आहे.
‘नोएल स्पोर्ट्स लीग-३ मध्ये आर्चरी ,चेस ,कॅरम , टेबल टेनिस व कबड्डी ह्या खेळांसाठी शहरातील वर्ग १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. यामधील काही खेळ वैयक्तिक, काही समुहामध्ये व वयोगटानुसार खेळले जाणारे होते. नोएल स्पोर्ट लिग – ३ मध्ये अकोला शहरातील व जिल्हयातील २५ स्टेट बोर्ड व सी.बी.एस.ई . शाळांच्या ५०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.
नोएल स्कूल अकोला (CBSE) ने ५९ गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळविला तसेच स्कुल ऑफ स्कॉलर्स, कॉलखेड ने ३० गुण घेऊन द्वितीय क्रमांक मिळविला. या वर्षीची ‘नोएल स्पोर्ट्स लीग-३ चैंपियनस ट्रॉफी’ ही स्कूल ऑफ स्कॉलर्स, कौलखेड,अकोला ला प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका रूपाली कुकडे, छाया सावरकर ,स्मिता जुमडे व श्रद्धा नागे यांनी केले.